मागील 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 188 नवीन कोरोना बाधितांची नोंद #Corona

चंद्रपूर, 25 ऑक्टोबर (का प्र) :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज 14772 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 188 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 11654 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 सध्या जिल्ह्यामध्ये 2898 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 11654 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 208 सह एकूण 220 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.