चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही,24 तासात नव्या 145 बाधितांची नोंद, आतापर्यंत 10036 बाधित कोरोना मुक्त #CoronaChandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

बरे होणाऱ्या बाधितांची संख्या जास्त

आतापर्यंत 10036 बाधित कोरोना मुक्त

Ø उपचार घेत असलेले बाधित 2 हजार 994

Ø जिल्ह्यात बाधितांची संख्या 13 हजार 227

Ø 24 तासात नव्या 145 बाधितांची नोंद

चंद्रपूर, दि.17 ऑक्टोंबर: जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्या बाधितांची संख्या उपचार घेणाऱ्या बाधितांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 10 हजार 036 बाधित कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर उपचार घेत असलेले बाधित 2 हजार 994 आहे. गेल्या 24 तासात नव्याने 145 बाधितांची नोंद झाली असून 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत 197 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 187, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ चार आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 

चंद्रपूर शहर व परीसरातील 78,
 बल्लारपुर तालुक्यातील 3,
 पोंभूर्णा तालुक्यातील 1, 
चिमूर तालुक्यातील 1, 
मुल तालुक्यातील 8, 
जिवती तालुक्यातील 3,
 ब्रह्मपुरी तालुक्यातील 17, 
 नागभीड तालुक्‍यातील 12,
 वरोरा तालुक्यातील 2, 
भद्रावती तालुक्यातील 1,
 सावली तालुक्यातील 3, 
सिंदेवाही तालुक्यातील  12,
 गडचिरोली  येथील 4
असे एकूण 145 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील
 जलनगर, 
शास्त्रीनगर, 
तुकूम,
 इंदिरानगर, 
कृष्णनगर,
 घुटकाळा वार्ड, 
भिवापूर वार्ड, 
बाबुपेठ, 
सिविल लाइन, 
नगिनाबाग, 
श्रीराम वार्ड, 
अंचलेश्वर गेट परिसर,
 विजय नगर,
 भाना पेठ वार्ड, 
मेजर गेट परिसर, 
ऊर्जानगर, 
बालाजी वार्ड,
 जीएमसी परिसर,
 गंज वार्ड, 
जटपुरा गेट 
परिसरातून  पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगर भागातून बाधित पुढे आले आहे.

 सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही, पेठगांव परिसरातून बाधित ठरले आहे. 

नागभीड तालुक्यातील गिरगाव, आलेवाही, भगतसिंग चौक, तळोदी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील गांधी वार्ड, कर्मवीर परिसरातून बाधित ठरले आहे. 

बल्लारपूर तालुक्यातील राणी लक्ष्मीबाई वार्ड, दहेली भागातून बाधित पुढे आले आहे.

 ब्रह्मपुरी तालुक्यातील श्रीनगर, उदापूर, शांतीनगर, सुंदर नगर, कुर्झा, हळदा, विद्यानगर, देऊळगाव, झाशी राणी चौक परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

मुल तालुक्यातील वार्ड नंबर सहा, वार्ड नंबर 11, वार्ड नंबर 14, वार्ड नंबर 16, जुनासुर्ला भागातून बाधित पुढे आले आहे.

 सावली तालुक्यातील चकपिरंजी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.