आज बुधवारी 315 कोरोना बाधितांची नोंद corona


चंद्रपूर, 14 ऑक्टोबर (का प्र): चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 12746 झाली आहे. गेल्या 24 तासात 315 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 9492 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3061 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 9492 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील 184 सह एकूण 193 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.


पहिला मृत्यू : सिस्टर कॉलनी परीसर , चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 11 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

दुसरा मृत्यू : मुल येथील 82 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .

 तिसरा मृत्यू : रयतवारी , चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 16 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

( गेल्या 24 तासातील हे वरील तीन मृत्यू आहेत . पहिल्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता . दुसऱ्या व तिसऱ्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार होता . तीनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . )

आतापर्यंत बरे झालेले बाधित आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 193 ( चंद्रपूर 184 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03 , भंडारा 01 )