चंद्रपुर शहर महानगर पालिका अंतर्गत बांधकामे नियमित करण्याची संधी Opportunity to regularize constructions under Chandrapur City Mahanagara Palika

📣 चंद्रपुर शहर महानगर पालिका अंतर्गत बांधकामे नियमित करण्याची संधी

📣 गुंठेवारी अंतर्गत चंद्रपुरतील वडगाव प्रभागातील बांधकामे नियमित करण्याची संधी  

📣 परवानगी न घेतल्यास कारवाईचे चंद्रपुर महानगर पालिका आयुक्तांचे निर्देश  
 
चंद्रपूर १३ ऑक्टोबर -  गुंठेवारी विकास अंतर्गत मौजा वडगाव प्रभागातील १० अभिन्यास मंजूर झाले असुन सदर सर्व्हे नंबर मधील भुखंड / बांधकाम धारकांनी लवकरात लवकर नियमित करून घ्यावे अन्यथा सदर बांधकामे अनधिकृत समजण्यात येऊन त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी स्पष्ट केले आहे.  
महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम २००१ अंतर्गत 

➡️ मौजा वडगाव प्रभागातील सर्वे नं वडगाव ५२/१,५२/२, वडगाव ४५/१ क, १६/१ पैकी, १५/१ अ, वडगाव १८, वडगाव ८१/३,वडगाव  देवई -गोविंदपुर रै. १०७/५६ अ, वडगाव १८ पैकी, वडगाव ४५/१ अ, वडगाव १६/१ व १७ चे अभिन्यास मंजुर झालेले आहेत. यातील काही सर्व्हेनंबरमधील बांधकामांना यापुर्वी मनपातर्फे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही परवानगी घेण्यात आलेली नाही. सदर सर्व्हे नंबर मधील भुखंडधारकांना आपले भुखंड / बांधकाम महानगरपालिकेकडुन परवानगी घेऊन नियमित करण्याची ही संधी आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालीकेतर्फे करण्यात येत आहे.  

बांधकाम परवानगीसाठी कागदपत्रांची पूर्तता ऑनलाईन करतांना येणाऱ्या समस्यांविषयी प्रॅक्टिसिंग आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स असोसिएशन चंद्रपूर यांच्या वतीने महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. निवेदनासंदर्भात बैठकीत परवानगी प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासंबंधात सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच ऑनलाईन प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सॉफ्टवेअर प्रशिक्षण शिबीर घेण्याचे आयुक्त यांनी निर्देश दिले.

📣 Opportunity to regularize constructions under Chandrapur City Mahanagara Palika

 📣 Opportunity to regularize constructions in Vadgaon ward of Chandrapur under Gunthewari

 📣 Instructions of Chandrapur Municipal Commissioner to take action if permission is not taken
 
 Chandrapur October 13 - Commissioner Vipin Paliwal has clarified that under Gunthewari development, 10 buildings in Mauja Vadgaon Ward have been approved and the owners of plots/buildings in the said survey number should regularize them as soon as possible otherwise the said constructions will be considered unauthorized and action will be taken against them.

 Under the Maharashtra Gunthewari Development (Regulation, Upgrading and Control) Act, 2001

 ➡️ Survey No. Vadgaon 52/1, 52/2, Vadgaon 45/1 C, 16/1 out of 15/1 A, Vadgaon 18, Vadgaon 81/3, Vadgaon Dewai - Govindpur Rai in Mauja Vadgaon Ward.  Out of 107/56 A, Vadgaon 18, Vadgaon 45/1 A, Vadgaon 16/1 and 17 have been approved.  Some of these constructions in survey numbers have been issued notices by Municipal Corporation.  But permission has not been taken yet.  This is an opportunity for the plot holders in the said survey number to regularize their plot / construction with permission from the Municipal Corporation.  The Municipal Corporation is appealing to take advantage of this.

 A statement was given to the Municipal Corporation on behalf of the Practicing Architects and Engineers Association Chandrapur about the problems faced while completing the documents for building permission online.  In relation to the statement, a positive discussion was held in the meeting to settle the permission cases at the earliest.  Also, the commissioner directed to conduct a software training camp to make the online process smooth.