कार व दुचाकीचा भीषण अपघात ; एकाचा मृत्यू तर एक जखमी #AccidentCarAndTwoWheeler

कार व दुचाकीचा भीषण अपघात ; एकाचा मृत्यू तर एक जखमी

चंद्रपूर : घुग्घुस ते वणी मार्गाने एकाच दिशेने जाणाऱ्या दुचाकीला मागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एक जखमी झाला आहे. सदर अपघात आज सोमवारला सकाळी झाला.

प्राप्त माहितीनुसार, वणी तालुक्यातील पुनवट येथील रहिवासी दिनकर उकिनकर (61) हे पुनवटहून घुग्घुसला त्यांच्या स्कुटीने MH 29 BR 2352 जात होते. याच वेळी राहुल जिरापुरे (35) रा. यवतमाळ हे त्यांच्या कारने MH 29 BC 7345 यवतमाळहून राजुरा येथे जात होते. ते बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असल्याची माहिती आहे. 

दरम्यान नायगाव ते बेलोरा मार्गावर स्कुटीला मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटीचालक उकिनकर हे त्यांच्या दुचाकीसह डिवायडरवर फेकले गेले. तर कार रस्त्यावर उलटली.

या अपघातात दुचाकीस्वार उकिनकार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तर कारक राहुल जिरापुरे हे किरकोळ जखमी झाले. दोन्ही जखमींना घुग्घुस येथील राजीव रतन दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. 

दुचाकीस्वार दिनकर उकिनकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलवण्यात आले.  या अपघातातील जखमी दुचाकीस्वार यांचा मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की यात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. या अपघातामुळे काही काळासाठी ट्राफिक जाम झाली होती. कार बाजुला केल्यानंतर तेथील वाहतूक सुरळीत झाली. सदर अपघाताचा तपास शिरपूर पोलीस तपास करीत आहेत.

साभार-मनोज कनकम