शहिदवीर बाबुराव शेडमाके यांच्या शौर्याचा इतिहासप्रेरणादायी - हंसराज अहीर, क्रांतिवीराच्या स्मृतिस श्रध्दांजली अर्पण Shahidvir Baburao Shedmake

➡️ शहिदवीर बाबुराव शेडमाके यांच्या  शौर्याचा इतिहासप्रेरणादायी  - हंसराज अहीर

➡️ क्रांतिवीराच्या स्मृतिस श्रध्दांजली अर्पण

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 21ऑक्टोबर: भारतमातेचे महान सुपूत्र, ब्रिटीशांचे कर्दनकाळ क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके (Krantivir Shahid Baburao Puleshwar Shedmake) यांच्या शौर्याचा इतिहास कित्येक भावी पिढयांसाठी सदैव प्रेरणा देणारा असेल. आज त्यांच्या शहिद दिनाचे स्मरण करतांना त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील कर्तृत्वापुढे मान अभिमाानाने नतमस्तक होते अशा शब्दात पुर्व केंद्रीय  गृहराज्यमंत्री  हंसराज अहीर (Ex Minister Hansraj Ahir) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दिनांक 21 ऑक्टोबर रोजी बाबुराव शेडमाके याच्या शहिद दिन अभिवादन कार्यक्रमास संबोधित करतांना त्यांनी सांगीतले की, चंद्रपूर जिल्हा कारागृहातील हे शहिद स्थळ अन्यायाविरूध्द लढा उभारण्याची प्रेरणा देणारे श्रध्दास्थळ आहे. या श्रध्दास्थळी सौंदर्यीकरण व्हावे यासाठी कारागृह मुख्यालयाची रितसर परवानगी घेवून या ठिकाणी भित्तीचीत्रांसह सौदर्यीकरण करूण घेण्यात आले आहे. भविष्यात या शहिद विरांच्या अनेक स्मृतींना येथे प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी याप्रसंगी सांगीतले.
चंद्रपुर जिल्हा प्रशासनाच्या कोविडविषयक (Covid-19) सुचनेनुसार आजचा शहिद दिन छोटेखानी स्वरूपात पार पडत असला तरी यापुढे भविष्यात शहिद दिन कार्यक्रमात या महापुरूषांच्या लढयाच्या योगदानाचे स्मरण करीत असंख्य अनुयायी या पवित्रा स्थळी माथा टेकविण्यास येतील असेही अहीर यांनी आपल्या संबोधनात सांगीतले.

कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी शहिद विरास श्रध्दांजली वाहुन त्यांच्या स्मृतीस मनोभावे नमन केले. डाॅ. प्रविण येरमे तसेच मनपा उपसभापती शितल कुळमेथे यांचा सेवाकार्याबद्दल हंसराज अहीर यांच शुभहस्ते  सन्मान करण्यात आला. शहिद दिन कार्यक्रमात शहिद शेडमाके यांचे डाकतिकीट उपस्थितांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमास माजी उपमहापौर (Ex Dy. Mayor) अनिल फुलझेले,  शहीद बाबुराव शेडमाके स्मारक समिती चे अध्यक्ष दयालाल कन्नाक,प्रमोद बोरीकर, विलास मसराम, प्रा. अशोक तुमराम,  मनपा नगरसेविका चंद्रकला सोयाम, माया उईके, ज्योती गेडाम, शितल आत्राम, भाजपा अनुसुचित जमाती मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष धनराज कोवे, माजी नगरसेवक रवि गुरनुले, गणेश गेडाम, राजेंद्र खांडेकर, दामोदर मंत्राी, राजु घरोटे, प्रशांत डाखरे, विठ्ठल कुमरे, शाम गेडाम, साईराम मडावी, कमलेश आत्राम, राधाबाई शिडाम, शाम मरसकोल्हे, शशिकला उईके, बापुजी गेडाम, विनोद शेरकी,  शुभम गेडाम, अरविंद मडावी, गिता गेडाम, सिमा मडावी, रविंद्र तुमराम, गणेश तुमराम, धर्मा गेडाम, सुधा आत्राम, जयश्री आत्राम, महिपाल गेडाम, पराग मलोडे यांचेसह बहुसंख्य समाजबांधवांची उपस्थिती होती.