खासदार बाळू धानोरकरांच्या माध्यमातून एल. पी. जी. शवदाहिनी चंद्रपुर शहरात लवकरच उपलब्ध होणार #ChandrapurLPGShavdahini #CMCChandrapur

खासदार बाळू धानोरकरांच्या माध्यमातून  
 एल. पी. जी. शवदाहिनी चंद्रपुर शहरात लवकरच उपलब्ध होणार  

चंद्रपूर : संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान मांडला आहे. या विषाणुचे लोन शहरात व ग्रामीण भागात पसरले आहे. चंद्रपुर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. दिवसाला २ पेक्षा जास्त कोरोना बाधितांचा मृत्यू होत आहे. मृत्यूची संख्या वाढत जात असल्याने मृतांच्या अंत्यसंस्कार विधीकरीता असलेल्या स्मशानभुमीत व्यवस्था अपुरी पडत आहे.

 अशा परीस्थितीत बरेचदा अंत्यविधी पार पाडायला अडचण होते, विलंब होतो. कोरोणा बाधितांच्या वाढत्या मृत्यूमुळे व कोरोणा विषाणूमुळे मृत  झालेल्यांच्या अंत्यविधीत घ्यावी लागणारी विशेष काळजी तथा उपाययोजना याचा नातेवाइकांसह प्रशासनाला देखील अपू-या व्यवस्थेमुळे अडचण होत आहे. 

प्रशासनासमोर बरेचदा या आपात्कालीन परीस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रश्न पडतो. अनेकदा अंत्यसंस्काराला विलंब होत असल्याने मृतदेहाची विटंबना होत असल्याच्या तक्रारी येत असतात. त्यामुळे शहरात  एल. पी. जी. शवदाहिनी लावण्याची सूचना  खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर शहर महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्याकडे केली होती. त्याची तात्काळ दाखल घेत 1 कोटी 2 लक्ष ८७ हजार १५० रुपयांच्या  अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. आता लवकरच चंद्रपूर शहरात एल. पी. जी शवदाहिनी  उपलब्ध होणार आहे. 

         चंद्रपुर  शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेनदिवस वाढत आहे. यामध्ये उपचार घेत असताना कोरोना बाधितांच्या मृत्यू देखील होत आहे. यामध्ये मृत्यू होणाऱ्या बाधितांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. महानगर पालिका प्रशासनातर्फे या मृत्यू पावलेल्या देहावर अंत्यसंस्कार  करण्यात येतात. त्यामुळे एल. पी. जी. शवदाहिनी शहरात लावल्यामुळे अंत्यविधी करतांना उत्पन्न होणारे अनेक प्रश्न सुटणार आहेत. 

महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या शवदाहिनी लावण्यात आल्या आहे. चंद्रपुर वाढत्या लोकसंख्येचे शहर असल्याने याचा फायदा कोरोणा आपात्कालीन काळात व ईतर वेळीही होणार आहे. माणसाच्या मरनोपरांत त्याच्या देहाची विटंबना होवू नये, नातेवाईक व प्रशासनाला त्रास होवू नये, याकरिता शवदाहिनी शहरात लवकर उपलब्ध करण्याच्या सूचना खासदार बालुभाऊ धानोरकर यांनी चंद्रपूर शहर महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांना दिल्या होत्या. त्याची दाखल घेत त्यांनी याबाबतीत प्रशासकीय बाबी पूर्ण करून जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच शहरात एल. पी. जी. शवदाहिनी उपलब्ध होणार आहे.