लिपिक संवर्गाचे 'कामबंद' आंदोलन; कामकाज ठप्प 'Workbandh' protest by clerical cadre; work halted

लिपिक संवर्गाचे 'कामबंद' आंदोलन; कामकाज ठप्प

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपुर : लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जलसंपदा  विभागांतील कर्मचाऱ्यांनी १६ फेब्रुवारीपासून कामबंद व असहकार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे शासकीय कार्यालयांमधील कामकाज पूर्णता विस्कळीत झाले असून,आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे दि. २३ पासून बेमुदत संपावर  कर्मचारी गेले आहे.

संपामुळे अनेक कामे रेंगाळली आहेत. लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना चौथ्या वेतन आयोगापासूनची वेतनत्रुटी दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, पदनामात बदल करावे, पदोन्नतीची साखळी कमी करावी. जुनी पेन्शन योजना लागू करावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा सूचीवर असलेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. जलसंपदा विभागातील चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ चंद्रपूर,पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग चंद्रपूर, लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर, चंद्रपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर,यांत्रिक्री विभाग क्र.२, मध्यम प्रकल्प विभाग चंद्रपूर तसेच इत्यादी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन काम बंद आंदोलन केले, व आपल्या मागण्यासाठी निदर्शन केले.या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
या वेळी जय महाराष्ट्र शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना जलसंपदा विभाग चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष श्री. गणेश गेडेकर, सचिव श्री.कालिदास शेंडे कार्याध्यक्ष श्री. रवी किन्नाके, माध्यम प्रमुख श्री. अनुप वनकर,उपाध्यक्ष सुनील पिंपळकर, खजिनदार श्री. गोविंद तागडे, श्री. संदीप बदकी महिला प्रमुख प्रज्ञा ढोके, व ईतर कर्मचारी उपस्थित होते.

'Workbandh' protest by clerical cadre; work halted