पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना चंद्रपूर शासकीय महाविद्यालय व सिकलसेल सॅटेलाईट सेंटर ला भेट देण्याचे निमंत्रण #HansrajAhir #DrHarshvardhan #ChandrapurMedicalCollege

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना चंद्रपूर शासकीय महाविद्यालय व सिकलसेल सॅटेलाईट सेंटर ला भेट देण्याचे निमंत्रण

   नई दिल्ली, 10 ऑक्टोबर : ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या चंद्रपूर ची ओळख आज वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय असून कोविड संकटात चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिकलसेल सॅटेलाईट सेंटर ची भूमिका महत्वपूर्ण असून या दोन्ही संस्थांना भेट देण्याचे निमंत्रण पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना नवी दिल्ली येथे केली आहे. 

या भेटीदरम्यान हंसराज अहीर यांच्यासोबत  एम्स नवी दिल्ली चे पूर्व डीन तथा आयसीएमआर चे वैज्ञानिक प्रोफे. एन. के. मेहरा यांची उपस्थिती होती. 

         देशात अस्थिमज्जा (Bone Marrow) नोंदणी (बँक) चे कार्य वर्ष २०१४  पासून सुरु असून या कार्याला गती देण्याची विनंतीही यावेळी हंसराज अहीर मंत्री महोदयांना केली.