एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार ; जयंत पाटलांची घोषणा #EknathKhadse #NCP #BJP

एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार ; जयंत पाटलांची घोषणा

मुंबई : गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशातील चर्चेवर अखेर पूर्णविराम लागला आहे . भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे . एकनाथ खडसे हे कन्या रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे . येत्या 22 ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल . एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील . त्यामुळे खडसे समर्थकांना सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे .
एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काय मिळणार ?

 राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल , इतकचं नाही तर त्यानंतर मंत्रिमंडळात एकनाथ खडसेंचा समावेश करण्यासाठी चर्चा सुरु आहे , यात शिवसेना राष्ट्रवादी खात्यांची अदलाबदल करून एकनाथ खडसेंना कृषिमंत्री पद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे .