महिलांबाबत अर्वाच्य शब्दात लिखाण केल्यास होणार कायदेशीर कारवाई: जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, वृत्तांकन करीत असतांना महीलांचा अनादर होवु नये, सर्व वृत्त माध्यमांनी सावधानी बाळगावे SP Chandrapur

महिलांबाबत अर्वाच्य शब्दात लिखाण केल्यास होणार कायदेशीर कारवाई:
जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे

चंद्रपूर , 07 ऑक्टोबर : देशात गाजत असलेल्या सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी अनेक वृत्तवाहिन्यांनी व डिजिटल न्यूज पोर्टल धारकांनी रिया चक्रवर्ती यांच्याबाबत अनेक अर्वाच्य भाषेत लिखाण करून त्यांची बदनामी केली , महिलांचा अनादर होऊ नये यासाठी वृत्तवाहिनी व डिजिटल पोर्टल धारकांनी सावधानता बाळगावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निर्देश चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिले आहे . देशात , राज्यात व जिल्ह्यात अश्या अनेक घटना घडत आहे , लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता परंतु सध्या वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे . सध्या काही वृत्तवाहिनी व डिजिटल पोर्टल धारक अर्वाच्य भाषेत लिखाण करून महिलांची बदनामी करीत आहे , यापुढे कोणत्याही प्रकरणात महिलांबाबत अर्वाच्य भाषेत लिखाण झाले व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाईचे संकेत जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिले आहे .