महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीत ' आयात उमेदवारांना संधी, चंद्रपुर चे अनिरूद्ध वनकर जाणार विधान परिषदेत #महाराष्ट्रविधानपरिषद #राज्यपाल #EknathKhadase #AnirudhWankar

मुंबई , 6 नोव्हेंबरः विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे सोपवण्यात आली आहे . 

राज्यपाल यांना दिलेल्या यादीत नाव असलेले बहुतांश उमेदवार बाहेरून आयात करण्यात आलेले आहेत . त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी 4-4 नावं पुढे आली आहेत . 
शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या निवाची शिफारस करण्यात आली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसने एक मित्र पक्षाला जागा देत उर्वरित तिन्ही उमेदवार नव्यानं पक्षात आलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे .

उमदेवारांना संधी दिल्याचे दिसत आहे . एकनाथ खडसे भाजापमधून एनसीपी पक्षात आलेले आहेत . प्रसिद्ध गायक आनंद शिंदे , यशपाल भिंगे तर मित्रपक्ष म्हणून राजू शेट्टी यांना संधी देण्यात आली आहे . यशपाल भिंगे यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या विरोधात वंचित बहुजन पक्षाच्या तिकिटावर लढवली होती . 
तर काँग्रेस पक्षानं 2019 मध्ये वंचित बहुजन पक्षाकडून निवडणूक लढवलेली अनिरुद्ध वनकर , रजनी पाटील , सचिन सावंत आणि मुझफ्फर हुसेन यांना संधी दिली आहे .
 शिवसेनेनं देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडलेली बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे . उर्मिला मातोंडकर यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढवली होती . मात्र , उर्मिला यांना पराभवाचा सामना करावा लागला होता . नंतर आता उर्मिला यांनी थेट शिवसेनेनं आयात करून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी बानगुडे पाटील यांना संधी दिली आहे .
 मात्र , शिवसेनेनं मिलिंद नार्वेकर , आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदार संघ सोडणारे सुनील शिंदे यांना संधी दिली नाही .

 सूत्रांकडून मिळालेली संभाव्य यादी .. 

राष्ट्रवादी काँग्रेस 

1)एकनाथ खडसे 
2)राजू शेट्टी 
3)यशपाल भिंगे
4)आनंद शिंदे 

काँग्रेस 

1)रजनी पाटील
2)सचिन सावंत 
3)मुझफ्फर हुसेन
4)अनिरुद्ध वनकर

शिवसेना

1)उर्मिला मातोंडकर
 2) चंद्रकांत रघुवंशी 
 3)विजय करंजकर
 4)नितीन बानगुडे पाटील