गेल्या 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 133 नव्याने बाधित ; 3 बाधितांचा मृत्यू Corona

चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत 14507 बाधित झाले बरे

गेल्या 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 133 नव्याने बाधित ; 3 बाधितांचा मृत्यू

उपचार घेत असलेले बाधित 2509

चंद्रपुर जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 17275

चंद्रपूर, दि. 11 नोव्हेंबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे तीन बाधितांचा मृत्यू झाला असून 133 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 17 हजार 275 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  126 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 507 झाली आहे. सध्या 2 हजार 509 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 28 हजार 221  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 9 हजार 523 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यु झालेल्या बाधितांमध्ये राजुरा तालुक्यातील कोहपरा येथील 78 वर्षीय पुरुष, 

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील 58 वर्षीय पुरुष तर 

ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगांव येथील 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत 259 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 243, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 90 पुरूष व 43 महिलांचा समावेश आहे. 
यात चंद्रपूर शहर व परिसरातील 42
बल्लारपूर तालुक्यातील 9,
 चिमूर तालुक्यातील सात, 
मुल तालुक्यातील सहा, 
गोंडपिपरी तालुक्यातील चार, 
जिवती तालुक्यातील एक, 
कोरपना तालुक्यातील एक, 
ब्रह्मपुरी तालुक्यातील 9, 
नागभीड तालुक्यातील एक,  
वरोरा तालुक्यातील 14, 
भद्रावती तालुक्यातील 17, 
सावली तालुक्यातील एक, 
 सिंदेवाही तालुक्यातील 11, 
राजुरा तालुक्यातील पाच, 
गडचिरोली तीन तर 
यवतमाळ व गोंदिया येथील प्रत्येकी एक असे एकूण 133 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील
 जटपुरा वार्ड,
 लालपेठ कॉलनी परिसर,
 श्रद्धा नगर, 
तुकूम, 
अरविंद नगर, 
शास्त्रीनगर, 
समाधी वार्ड, 
घुटकाळा वार्ड, 
बापट नगर,
 चिंचाळा, 
नानाजी नगर,
 बाबुपेठ, 
भिवापूर वार्ड,
 इंदिरानगर, 
ऊर्जानगर, 
दुर्गापुर, 
सरकार नगर, 
भानापेठ वार्ड, 
बगड खिडकी परिसर, 
लक्ष्मी नगर वडगाव 
भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव, बालाजी वार्ड, दूधोली बामणी, गणपती वार्ड, श्रीराम वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव, झाशी राणी चौक, गाडगेबाबा नगर, कपिलवस्तु नगर, देलनवाडी, पिंपळगाव, मालडोंगरी परिसरातून बाधित ठरले आहे. 

राजुरा तालुक्यातील शिवाजीनगर,सास्ती, लखमापूर, धोपटाळा भागातून बाधित पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील  गजानन नगर, कृषी नगर, आनंदवन परिसर, राम मंदिर वार्ड, सलीम वार्ड, कमला नेहरू वार्ड, मालवीय वार्ड, कर्मवीर वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. 

भद्रावती तालुक्यातील लोणारा, जैन मंदिर रोड, बंगाली कॅम्प, सुरक्षा नगर, गांधी चौक, डिफेन्स चांदा परिसर, गौतम नगर, खोबरे प्लॉट  परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर, नवरगाव, अंतरगाव, ऊसेगाव भागातून बाधित पुढे आले आहे. 

नागभीड तालुक्यातील मासळ,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. 

मुल तालुक्यातील वार्ड नंबर 14, गडीसुर्ला,ताडाला,चकदुगाळापरिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील राम मंदिर परिसर, तळोधी भागातून बाधित पुढे आले आहे.

 चिमूर तालुक्यातील  वडाळा पैकु, गांधी वार्ड, नेताजी वार्ड, मोटेगाव, शंकरपुर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.