174 नव्याने पॉझिटिव्ह ; 7 बाधितांचा मृत्यू,
चंद्रपूर शहर व परीसरातील 60,
आतापर्यंत 13573 बाधित झाले बरे,
उपचार घेत असलेले बाधित 2681,
चंद्रपूर, दि. 5 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 269 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 174 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपुर शहरातील बाबुपेठ येथील 52 वर्षीय पुरुष
तर तालुक्यातील मोहर्ली येथील 30 वर्षीय पुरुष,
ऊर्जानगर येथील 46 वर्षीय पुरुष,
घुग्घुस येथील 55 वर्षीय पुरुष,
चिमूर शहरातील 52 वर्षीय पुरुष,
पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा येथील 32 वर्षीय पुरुष,
चंद्रपूर जिल्ह्यातील साखरी येथील 61 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत 249 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 233, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 174 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 हजार 503 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 269 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 573 झाली आहे. सध्या 2 हजार 681 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 23 हजार 950 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 5 हजार 913 नमुने निगेटीव्ह आले आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 174 बाधितांमध्ये 101 पुरुष व 73 महिला आहेत.
यात चंद्रपूर शहर व परीसरातील 60,
बल्लारपूर तालुक्यातील 10,
चिमूर तालुक्यातील 9,
मुल तालुक्यातील दोन,
गोंडपिपरी तालुक्यातील एक,
जिवती तालुक्यातील दोन,
कोरपना तालुक्यातील 13,
ब्रह्मपुरी तालुक्यातील 9,
नागभीड तालुक्यातील आठ,
वरोरा तालुक्यातील 11,
भद्रावती तालुक्यातील 25,
सिंदेवाही तालुक्यातील तीन,
राजुरा तालुक्यातील 21
असे एकूण 174 बाधित पुढे आले आहे.
याठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहर व परिसरातील
दुर्गापुर,
वृंदावन नगर,
कृष्णा नगर,
रामनगर,
सिव्हील लाईन,
नगीना बाग,
बाबुपेठ,
बालाजी वार्ड,
तुकुम,
पठाणपुरा वार्ड,
बाजार वार्ड,
बंगाली कॅम्प,
भानापेठ वार्ड,
दाताळा,
घुग्घुस,
कबीर नगर,
सरकार नगर,
मोरवा,
घुटकाळा
भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
तालुक्यातून या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील टिळक वार्ड, कन्नमवार वार्ड, मानोरा, बामणी परिसरातून बाधित पुढे आले आहे.
चिमूर तालुक्यातील खडसंगी, लोहारा, गांधी वार्ड, वडाळा पैकु भागातून बाधित ठरले आहे.
मुल तालुक्यातील डोंगरगाव, वार्ड नंबर 2 परिसरातून बाधित पुढे आले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील तळोधी परिसरातून बाधित ठरले आहे.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील नवेगाव मक्ता, गुरुदेव नगर, गुजरी वार्ड, तोरगाव खुर, चोरगाव बु, भागातून बाधित ठरले आहे.
नागभीड तालुक्यातील तळोधी, नवखळा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
वरोरा तालुक्यातील टिळक वार्ड, राम मंदिर परिसर दत्त मंदिर वार्ड, मालवीय वार्ड, आनंदवन परिसरातून बाधित पुढे आले आहे.
भद्रावती तालुक्यातील मल्हारी बाबा सोसायटी परिसर, राधाकृष्ण कॉलनी परिसर, गणपती वार्ड, पंचशील नगर, शास्त्रीनगर, संताजी नगर, गुरु नगर, सुरक्षा नगर, नागसेन नगर, झाडे प्लॉट परिसर, भोजवाड, गुरूनगर देवाला भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर, नवरगाव परिसरातून बाधित पुढे आले आहे.
राजुरा तालुक्यातील मज्जिद वार्ड, सहकार नगर, माता मंदिर वार्ड, आझाद चौक, भेदोडा, कामगार नगर, शिवनगर वार्ड, सोमनाथपूर, सास्ती, भारत चौक भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.