सर्व प्रकारचे फटाके व आतिषबाजीवर पूर्णतः बंदी #cmc #चंद्रपुर #CMCChandrapur

सर्व प्रकारचे फटाके व आतिषबाजीवर पूर्णतः बंदी

निर्देशाचे पालन न करणाऱ्यावर होणार कार्यवाही ; सहाय्यक आयुक्त यांचे नियंत्रणाखाली पथक गठित

मा. राष्ट्रिय हरीत लवाद यांचे निर्देशाप्रमाणे संपूर्ण प्रकारचे फटाक्यावर व आतिषबाजीवर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर हद्दित सर्व प्रकारचे फटाके व आतिषबाजी करण्यावर बंदी आहे. 
तरी चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर क्षेत्रामध्ये हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीमध्ये येत असून पर्यावरण पुरक फटाके फोडण्यास रात्री ८.०० ते १०.०० वाजताच्या कालावधीत दिवाळीमध्ये मुभा राहिल. उपरोक्त निर्देशाचे पालन न करणाऱ्या व्यावसायिक व नागरीकांवर झोन क्र. १,२,३ मार्फत कार्यवाही करण्यात येईल.

 याकरीता सहाय्यक आयुक्त यांचे नियंत्रणाखाली पथक गठित करण्यात आलेले आहे.