हंसराज अहीर यांचे सांसदिय कार्य उल्लेखनिय म्हणूनच अनेक विश्वविख्यात मान्यवरांकडून त्यांची नेहमीच प्रशंसा- अॅड. रविंद्र भागवत #HansrajAhir #Chandrapur

हंसराज अहीर यांचे सांसदिय कार्य उल्लेखनिय म्हणूनच अनेक विश्वविख्यात मान्यवरांकडून त्यांची नेहमीच प्रशंसा- अॅड. रविंद्र भागवत

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा विमोचन सोहळा संपन्न

  चंद्रपुर ,11 नोवेम्बर :पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  दिनांक 11 नोव्हेंबर 2020 रोजी आय.एम.ए. सभागृह, चंद्रपूर येथे हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार व खासदार म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या पुस्तकाचे विमोचन प्रसिद्ध विधिज्ञ तथा नगर संघचालक अॅड. रविंद्र भागवत जी  यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी हंसराज अहीर उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर ग्रामिण, डाॅ. मंगेश गुलवाडे, महानगर जिल्हाध्यक्ष, सौ. राखीताई कंचर्लावार, महापौर,  गोंडवाना विद्यापिठाचे माजी कुलगुरु डाॅ. किर्तीवतर्धन दिक्षित, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग विभागाचे विभाग प्रमुख प्रसिद्ध बालरोग तज्ञ डाॅ. एम.जे. खान, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, अॅड. विनायनकराव बापट, अॅड. अभय पाचपोर, सौ. अंजली घोटेकर, माजी महापौर, मनोवेध प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. विजय बदखल उपस्थित होते.
हंसराज अहीर यांच्या सांसदिय कार्याबद्दल सांसदीय कार्याबद्दल पूर्व राश्ट्रपती तथा भारतरत्न स्व. ए.पी.जे. अब्दुल कलाम जी, पूर्व लोकसभा सभापती स्व. सोमनाथ चॅटर्जी जी, मा.प्रधानमंत्राी श्री. नरेंद्र मोदी जी आदि मान्यवरांच्या गौरवोद्गारांचे तथा खासदार म्हणून कोळसा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी केलेल्या कार्याचा आणि इतर उल्लेखनीय कार्याच्या माहितीचे संकलन पुस्तक रुपात करण्यात आले आहे.  यावेळी बोलतांना अॅड. रविंद्र भागवत म्हणाले की अहीर यांनी लोकसभेत दखल घ्यावी अशी कामे केल्यामुळे सोमनाथ चॅटर्जी, भारतरत्न अब्दुल कलाम, प्रधानमंत्राी मोदी यांनी त्यांच्या कामाची दखल घेवून गौरवोद्गार काढले आहे. गृहराज्यमंत्राी म्हणून हंसराज अहीर यांची कारकिर्द यशस्वी कारकिर्द राहीली आहे. त्यांच्या काळात देशात कुठेही दंगे, अतिरेकी कारवाया, बाॅम्बस्फोट, घुसपेठ झाली नाही. बाराबलुतेदारांसाठी झटणारा, त्यांना एकत्रा करण्याच काम करणारा एकमेव व्यक्ती म्हणून अहीर यांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की खासदार म्हणून अहीर यांनी अनेक उल्लेखनीय कार्य केले असून 5000 लहान मुलांच्या मधुमेह आजाराचा मेडिकल कॅम्प त्यापैकी एक असल्याचे भागवत म्हणाले. ते आता निवडून आलेले खासदार जरी नसले तरी लोकांच्या मनातले खासदार असल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
महापौर राखीताई कंचर्लावार यांनी हंसराजभैया भाजपाचे पितृतुल्य नेतृत्व असल्याचे म्हणाल्या. यावेळी डाॅ. एम.जे.खान, डाॅ. मंगेश गुलवाडे, विजय बदखल, अॅड. विनायक बापट यांची समयोचीत भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. किर्तीवर्धन दिक्षित तर आभार प्रदर्शन अॅड. अभय पाचपोर यांनी केले.
 या कार्यक्रमात खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, राजेश मून, राजेंद्र गांधी, युवानेता रघुविर अहीर, राजेंद्र अडपेवार, मोहण चैधरी, डाॅ. राजू सैनानी, डाॅ. रजनीकांत भलमे, अरुण तिखे, दामोदर मंत्राी, रमणीकभाई चव्हाण, डाॅ. भूपेश भलमे, प्रदिप माहेश्वरी, प्रल्हाद शर्मा, अमोल पाल, सुरेंद्र गांधी, रत्नाकर जैन, पूनम तिवारी, गिरीष अणे, हेमंत डहाके, सुधिर टिकेकर, अनिल अंदनकर, कृष्णा देशपांडे, नंदू वेखंडे, सुहास आवळे, रवि येनारकर,  जि.प. सभापती राजू गायकवाड, जि.प. सदस्य राहूल संतोषवार, रमेश भूते, प्रमोद शास्त्राकार, राजेंद्र तिवारी, विनोद शेरकी, सारीका संदूरकर, नगरसेविका शिलाताई चव्हाण, शितल गुरनुले,  आशाताई आबोजवार, अनुराधा हजारे, वंदना तिखे, सविता कांबळे, छबुताई वैरागडे, चंद्रकला सोयाम, माया उईके, पुष्पा उराडे, प्रभा गुडधे, किरण भडके, संदिप आवारी, राहूल घोटेकर, सुभाष कासनगोट्टुवार, सोपान वायकर, रवि गुरनुले, राजू घरोटे, विठ्ठल डुकरे, विकास खटी, तुषार मोहुर्ले, राहूल बोरकर, साईनाथ उपरे, शशीकांत मस्के, अभिनव लिंगोजवार, धनंजय मुक्कलवार, यश ठाकरे, विशाल बुरडकर, विकी लाडसे, प्रणय डंबारे यांची उपस्थिती होती.