जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष पुढेही सुरूच ठेवणार : संदीप जोशी, मध्य नागपूरमध्ये संपर्क दौरा : पदवीधर, शिक्षक, प्राध्यापकांनी दर्शविले समर्थन #मध्यनागपुर

जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष पुढेही सुरूच ठेवणार : संदीप जोशी

मध्य नागपूरमध्ये संपर्क दौरा : पदवीधर, शिक्षक, प्राध्यापकांनी दर्शविले समर्थन

नागपूर, २२ नोवेम्बर:  राजकारणामध्ये असताना समाजकारण करणे हा पिंड आहे. तो कधीही बदलणार नाही. समाजातील विविध प्रश्नांसाठी आजपर्यंत नेहमीच संघर्ष करत आलोय. त्याच संघर्षाच्या बळावर मागील २० वर्षापासून जनतेने आपला नगरसेवक प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये विविध जबाबदा-या स्वीकारण्याची संधी दिली. या संघर्षाचेच फलित की लक्ष्मीनगरातील जनतेने २०१७मध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येण्याचा मान दिला. त्यामुळे या जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद आणि मोठे काही करण्याचे धाडस देते. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच संघर्ष करत आलोय पुढेही तो कायमच राहिल, असा विश्वास नागपूर पदवीधर मतदार संघाचे भाजप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप यांनी व्यक्त केला. 
मध्य नागपूर आणि दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये झालेल्या संपर्क दौ-यादरम्यान विविध ठिकाणी झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. 
मध्य नागपूरमध्ये विविध ठिकाणी झालेल्या संपर्क दौ-यामध्ये आमदार प्रवीण दटके, आमदार गिरीश व्यास, शिक्षक आमदार नागो गाणार, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अर्चना डेहनकर, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, शिक्षण मंचच्या अध्यक्षा कल्पना पांडे, डॉ.राजेश मुरकुटे, सुधीर दप्तरी, अजय धाक्रस, किशोर पालांदुरकर, नगरसेवक प्रमोद चिखले, नगसेवक संजय महाजन, नगरसेविका श्रद्धा पाठक, नगरसेविका सरला नायक, माजी नगरसेविका सारीका नांदुरकर, सुनील नांदुरकर, पूर्तीचे सीईओ समय बनसोड, सुधीर (बंडू) राउत, अमोल चंदनखेडे, डॉ.हेमंत निंबाळकर, डॉ.सतीश गुप्ता, ॲड.प्रकाश जैस्वाल, गिरीश मुंधडा, मोहन अरमटकर, कृष्णा कावळे, बादल राउत, बबनराव पाठराबे, आनंद नखाते, नितीन नखाते, संतोष नखाते, प्रशांत मानेकर, प्रा. पुरूषोत्तम येनुरकर, सिनेट सदस्य विष्णू चांगदे, सिनेट सदस्य दिनेश शेराम, योगेश बंग आदी उपस्थित होते. तर दक्षिण- पश्चिम नागपूरमधील दौऱ्यात माजी नगरसेवक गोपाल बोहरे,संजय भेंडे, मुन्ना यादव, नगरसेवक लखन येरावार, वर्षा ठाकरे, माजी नगरसेविका नीलिमा बावणे आदी सहभागी झाले होते.

याप्रसंगी बोलताना संदीप जोशी म्हणाले, ही निवडणूक अन्य निवडणुकीपेक्षा वेगळी असते. यात बॅलेट पेपर वर उमेदवारासमोर क्रमांक लिहून पसंती दर्शवायची असते. तिथे उपलब्ध पेनाचाच वापर करावा लागतो. क्रमांक लिहितानाही तो योग्यप्रकारे लिहावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रत्येक बैठक आणि सभेला भाजपचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.