1 मई 2021 पासून नागपूर - शिर्डी वाहतूक ; हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा #1MaySeSamruddhiMahamarg #नागपुर #शिर्डी #महामार्ग

1 मई 2021 पासून नागपूर - शिर्डी वाहतूक ;    हिंदु हृदयसम्राट   बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

अमरावती, 05 दिसंबर : कोरोना काळातही समृद्धी महारार्गाचं काम सुरू होतं . येत्या १ मे पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरू होईल , असे त्यांनी जाहीर केले . मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसूलापूर परिसरात समृद्धी महामार्गाची पाहणी केली .

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या समृद्धी महामार्गाचे म्हणजेच आजच्या हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे . 

आज शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामार्गाच्या कामाची पाहणी केली आणि १ मे २०२१ म्हणजेच महाराष्ट्र दिनी नागपूर ते शिर्डी दरम्यान वाहतूक सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले . 

राज्य सरकारसाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे .
चांगल्या दर्जाचं काम होत आहे . कोरोना काळातही समृद्धी महारार्गाचं काम सुरू होतं . येत्या १ मे पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरू होईल , असे त्यांनी जाहीर केले . मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसूलापूर परिसरात समृद्धी महामार्गाची पाहणी केली . 

यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्र यशोमती ठाकूर , वनमंत्री संजय राठोड , माजी खासदार आनंदराव अडसूळ , माजी आमदार वीरेंद्र जगताप , विभागीय आयुक्त पीयूष सिंह , जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते .समृध्दी महामार्गाच्या कामाची हवाई पाहणी करण्यासाठी ते आज अमरावती आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत . दरम्यान ते प्रसार माध्यमांशी बोलत होते . 

पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी दरम्यान समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले . समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली . या महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले .