चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू , 51 नव्याने पॉझिटिव्ह Corona

गत 24 तासात 162 कोरोनामुक्त

51 नव्याने पॉझिटिव्ह ; 2 मृत्यू

आतापर्यंत 19,843 बाधित झाले बरे

 उपचार घेत असलेले बाधित 1,005

चंद्रपूर, दि. 11 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 162 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 51 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 180 वर पोहोचली आहे.

 तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 19 हजार 843 झाली आहे. सध्या एक हजार पाच बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 59 हजार 61 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 35 हजार 714 नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

आज मृत झालेल्यांमध्ये चंदनवाही, ता. राजुरा येथील 65 वर्षीय पुरूष व 

वरोरा येथील 86 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 332 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 306, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 15, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 51 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 21, 
चंद्रपूर तालुक्यातील दोन, 
बल्लारपुर एक, 
भद्रावती चार, 
ब्रम्हपुरी एक, 
नागभीड एक, 
मुल एक, 
गोंडपिपरी एक, 
राजुरा दोन, 
चिमुर अकरा, 
वरोरा पाच 
तसेच इतर 
ठीकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.