चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 50 नव्याने पॉझिटिव्ह corona

गत 24 तासात 64 कोरोनामुक्त

50 नव्याने पॉझिटिव्ह 

 आतापर्यंत 21,108 बाधित झाले बरे

 उपचार घेत असलेले बाधित 605

चंद्रपूर, दि. 25 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 64 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 50 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 71 वर पोहोचली आहे. 

तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 108 झाली आहे.

 सध्या 605 बाधितांवर उपचार सुरू आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 68 हजार 118 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 43 हजार 536 नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

आज मृत झालेल्यांमध्ये जांभळघाट चिमूर येथील 71 वर्षीय पुरुष व 

बल्लारपूर शहरातील 64 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 358 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 331, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 50 रुग्णांमध्ये
 चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 28,
 चंद्रपूर तालुका 10, 
बल्लारपूर एक, 
भद्रावती चार, 
नागभीड एक, 
सिंदेवाही एक, 
मूल एक, 
चिमुर एक व 
वरोरा येथील तीन  रुग्णाचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.