चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 27 नव्याने पॉझिटिव्ह #CoronaChandrapur

गत 24 तासात 54 कोरोनामुक्त

27 नव्याने पॉझिटिव्ह 

 आतापर्यंत 20,978 बाधित झाले बरे

उपचार घेत असलेले बाधित 644

चंद्रपूर, दि. 23 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 27 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 978 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 20 हजार 978 झाली आहे. 

सध्या 644 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 66 हजार 370 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 42 हजार 302 नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत 356 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 329, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 27 रुग्णांमध्ये 
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील नऊ, 
बल्लारपुर दोन,
 भद्रावती तीन,
 ब्रम्हपुरी एक,
 मूल चार, 
चिमुर दोन,
 वरोरा चार व 
इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.