मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांना सूचना #Election #VotingList #VoterID #मतदारयादि

मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांना सूचना

चंद्रपूर, दि. 23 डिसेंबर : भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार 01 जानेवारी 2021 या अर्हता दिनाकांवर आधारीत विधानसभा मतदार संघाच्या प्रारुप छायाचित्र मतदार याद्या दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.  यात चंद्रपूर जिल्हयांतील 70-राजूरा, 71-चंद्रपूर, 72- बल्लारपूर, 73-ब्रम्हपूरी, 74-चिमूर व 75-वरोरा या सहा विधानसभा मतदार संघाच्या याद्याचा समावेश आहे. सदर प्रारुप मतदार यादीतील ज्या मतदाराचे फोटो नाहीत, तर काही मतदार कायमस्वरुपी स्थानांतरीत झाल्याचे निर्दशनास आलेले आहे. 

तरी ज्या मतदाराचे मतदार यादीत फोटो नाहीत व जे कायमस्वरुपी स्थानांतरीत झालेले आहेत, अशा सर्व मतदाराना सुचित करण्यात येते की, ही सूचना प्रसिध्द केल्याचे तारखेपासून सात दिवसांचे आंत आपले पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो संबंधित तहसिल कार्यालयांत जमा करावेत किंवा आपले नांव मतदार यादीतून वगळण्यासाठी नमूना -७ तहसिल कार्यालयांत सादर करावा. अन्यथा मतदार नोंदणी नियम , 1960 चे नियमांतील तरतूदीनुसार छायाचित्र मतदार यादीतून नांव वगळणीबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.