गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात केवळ 2 पॉझिटिव्ह , एकाचा मृत्यु Corona

गत 24 तासात केवळ 2 पॉझिटिव्ह

15 कोरोनामुक्त ; एक मृत्यू

 आतापर्यंत 22,208 जणांची कोरोनावर मात

 ॲक्टीव पॉझिटिव्ह 262

चंद्रपूर, दि. 18 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 15 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 2 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 852 वर पोहोचली आहे. 

तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 208 झाली आहे. सध्या 262 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 89 हजार 499 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 65 हजार 56 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील सहकार नगर येथील 62 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.  

जिल्ह्यात आतापर्यंत 382 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 347, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 12, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 2 रुग्णांमध्ये भद्रावती एक व  राजूरा एक रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.