भाजपाचे ज्येष्ठ नेते पूर्व नगरसेवक शंकर वाकोडे यांचे निधन , समाजसेवक व पक्षासाठी निष्ठेने कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता हरपला- पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर #BJP

भाजपाचे ज्येष्ठ नेते पूर्व नगरसेवक शंकर वाकोडे यांचे निधन

 समाजसेवक व पक्षासाठी निष्ठेने कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता हरपला- पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

चंद्रपूर, 28 जानेवारी: भाजपाचे ज्येष्ठ नेते पूर्व नगरसेवक शंकर वाकोडे यांचे दिनांक 28 जानेवारी 2021 ला दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पूर्व नगराध्यक्ष विजय राऊत, राजेश मून, खुशाल बोंडे,  राजेंद्र गांधी, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, वसंता देशमुख, राहूल घोटेकर, संदिप किरम यांचे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

त्यांची आई जूने कपडे विकून घरचा उदरनिर्वाह करीत होत्या. घरची आर्थिक परिस्थीती अत्यंत हलाखीची असतांना ही सामाजिक कार्याची आवड असल्याने सदैव समाजकार्य करीत राहीले. त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या संघटन बांधणीत मोलाचे योगदान होते.  भाजप तर्फे ते 3 वेळा नगरसवेक होते.

शंकर वाकोडे यांचे निधनाने एक निडर, पक्षासाठी निष्ठेने कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता हरपला, त्यांच्या निधनाने पक्षाची न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना हंसराज अहीर यांनी व्यक्त केली. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले व बराच आप्तपरीवार आहे