आमदार प्रतिभाताई धानोरकरांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबीर #MLAPratibhaDhanorkar

आमदार प्रतिभाताई धानोरकरांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबीर

चंद्रपूर : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच प्रादुर्भाव आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहेत.वाढदिवसाला भव्य रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे. ९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता  वरोरा येथील जनसंपर्क कार्यालयात रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, तृतीयपंथी समाजाचे प्रश्न, माईंनीग शाखेत मुलींना प्रवेश मिळवून देण्याच्या प्रश्न सोडविण्याकरिता नेहमी आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या नेहमी आग्रही असतात. अल्पावधीतच आमदार धानोरकर यांनी महिलांचे अनेक प्रश्न विधिमंडळात लावून धरल्याने महिलांच्या प्रश्नासंबंधी जागरूक आमदार म्हणून त्यांची लोकप्रियता वाढत आहे.    

त्यांच्या वाढदिवस मोठ्या पद्धतीने साजरा करण्याकरिता महिला कार्यकार्ते आग्रही आहेत. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. भव्य रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येत रक्तदान करून जनतेला जीवनदान देण्याकरिता रक्तदान करण्याचे आवाहन युवक काँग्रेस वरोरा यांनी केले आहे.