आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बांधण्‍यात आलेल्‍या पत्रकार भवनाचे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण १० जानेवारी रोजी #PatrakarBhawan #DrBabasahebAmbedkarBhawan #Chandrapur #SudhirMungantiwar

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बांधण्‍यात आलेल्‍या पत्रकार भवनाचे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण १० जानेवारी रोजी

माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर शहरातील जुना वरोरा नाका चौकात बांधण्‍यात आलेल्‍या पत्रकार भवनाचे तसेच पवित्र दीक्षाभूमी परिसरात बांधण्‍यात आलेल्‍या भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण रविवार, दि. १० जानेवारी २०२१ रोजी संपन्‍न होणार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात वैशिष्‍टयपुर्ण निधीतून पत्रकार भवनाचे बांधकाम मंजुर करण्‍यात आले. सदर पत्रकार भवनाचे बांधकाम पुर्ण झाले असुन दुपारी १.०० वा. सदर पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्‍यात आला आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पवित्र दीक्षाभूमी परिसरात २ कोटी रु. निधी खर्चुन भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम करण्‍यात आले आहे. अतिशय आकर्षक व देखणे स्‍वरुप लाभलेल्‍या या भवनाचा लोकार्पण सोहळा सायं. ४.०० वा. आयोजित करण्‍यात आला आहे. या दोन्‍ही कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्‍यात आले आहे.