गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 23 पॉझिटिव्ह, 12 कोरोनामुक्त , एक मृत्यू , आतापर्यंत 22,803 जणांची कोरोनावर मात , ॲक्टीव पॉझिटिव्ह 118 #ChandrapurCoronaUpdate

गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात                       23 पॉझिटिव्ह, 12 कोरोनामुक्त , एक मृत्यू

  आतापर्यंत 22,803 जणांची कोरोनावर मात

  ॲक्टीव पॉझिटिव्ह 118

चंद्रपूर, दि. 19 फेब्रुवारी : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 12 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 23 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 317 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 803 झाली आहे. 

सध्या 118 बाधितांवर उपचार सुरू आहे. 

आतापर्यंत दोन लाख आठ हजार 785 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 83 हजार 642 नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या वडगांव पोलीस चौकी हद्दीतील 27 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. 

चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत 396 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 358, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 23 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 10, चंद्रपूर तालुक्यात तीन, बल्लारपूर दोन, सिंदेवाही दोन, मुल एक, वरोरा चार व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.