गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात आठ कोरोनामुक्त ; सात पॉझिटिव्ह #CoronaChandrapurUpdate

गत 24 तासात आठ कोरोनामुक्त ; सात पॉझिटिव्ह

 आतापर्यंत 22,669 जणांची कोरोनावर मात

 ॲक्टीव पॉझिटिव्ह 92

चंद्रपूर, दि. 9 फेब्रुवारी :  जिल्ह्यात मागील 24 तासात आठ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सात कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. 

सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 23 हजार 153 झाली असून त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 669 झाली आहे. सध्या 92 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख चार हजार 180 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 79 हजार 91 नमुने निगेटीव्ह आले आहेत. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 392 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 354, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या सात रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील तीन, राजुरा दोन व वरोरा येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.