लॉकडाउन साठी राज्यभरातील नागरिकांना येत्या 8 दिवसाचा अल्टीमेंटम #Maharashtra #Lockdown #लॉकडाउनअल्टीमेटम #CMMaharashtra

राज्यभरातील नागरिकांना येत्या 8 दिवसाचा अल्टीमेंटम

मुंबई : महाराष्ट्र राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी जनतेला सम्बोधित करतांना अनेक सूचना केल्या यानुसार कोरोनाचे हॉट स्पॉट ठरत असलेल्या शहर व जिल्ह्यात पुढील सूचना पर्यंत शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार आहे.

 तसेच या दरम्यान राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावर प्रतिबंध घालण्यात आले असून आज 21 फरवरी 2021 ला राज्यभरात 6971 नव्या कोरोना रुग्णाची भर पडली असून रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.

 याबाबत बोलतांना ना.उध्दव ठाकरे यांनी डॉ.नितीन राऊत यांचा विशेषत्वाने उल्लेख करतांना त्यांनी आपल्या मुलाचा विवाह सोहळा स्थगित केला असून या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने विवाह सोहळ्याला गर्दी करू नये.

 तसेच अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडावे प्रत्येक नागरिकांनी कोरोनापासून संरक्षण करतांना मॉस्क, सॅनिटाईजर, व सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे सद्यस्थितीत राज्यभरात 9 लाखाच्या जवळपास कोरोना योद्धांना लसीकरण झाले असून नागरिकांनी याबाबत गाफील राहू नये असे आवाहन सुध्दा केले आहे.

 तसेच राज्यभरात कोरोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या जिल्ह्यात उद्या 22 फरवरी 2021 पासून कडक निर्बंध लादण्यात येत असून पुढील आदेशापर्यंत वा कोरोनाचा प्रभाव नियंत्रणात येईल पर्यत स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत तसेच राज्यभरातील नागरिकांना येत्या 8 दिवसाचा अल्टीमेंटम देण्यात आला असून या दरम्यानच्या काळात नागरिकांनी मॉस्क व कोरोना प्रतिबंधक उपाययोजना चा कसोशीने पालन करून कोरोना नियंत्रणात आणण्यास मदत करावी अन्यथा राज्यभरात कडक लॉकडाउन च्या पर्यायाशिवाय मार्ग नाही अशा प्रकारचे सूचना केल्या आहेत.