मनपाच्‍या नवनिर्वाचित पदाधिका-यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले स्‍वागत #Chandrapur #सुधीरमुनगंटीवार #रविआसवानी


मनपाच्‍या नवनिर्वाचित पदाधिका-यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले स्‍वागत
 
चंद्रपुर : चंद्रपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्‍थायी समिती सभासपती श्री. रवी आसवानी, महिला व बालकल्‍याण समितीच्‍या सभापती सौ. चंद्रकला सोयाम, उपसभापती सौ. पुष्‍पा उराडे, झोन क्र. १ चे सभापती अॅड. राहुल घोटेकर, झोन क्र. २ च्‍या सभापती सौ. संगीता खांडेकर, झोन क्र. ३ चे सभापती श्री. अंकुश सावसाकडे यांचे स्‍वागत विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले व त्‍यांच्‍या यशस्‍वी कार्यकाळासाठी त्‍यांना शुभेच्छा दिल्‍या. 
यावेळी महानगर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखीताई कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, नगरसेवक संजय कंचर्लावार, संदिप आवारी, प्रकाश धारणे, राजेंद्र खांडेकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.