कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमी ने प्रकल्पग्रसंगतांच्या मागण्यांना न्याय द्यावा, अन्यथा महाग पडेल, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा बरांज (मो) येथील नवनियुक्त सरपंच / उपसरपंच सत्कार सोहळ्यात केपीसीएल ला इशारा #KarnatakPowerCorporation #HansrajAhir

कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमी ने प्रकल्पग्रसंगतांच्या मागण्यांना न्याय द्यावा, अन्यथा महाग पडेल

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा बरांज (मो) येथील नवनियुक्त सरपंच / उपसरपंच सत्कार सोहळ्यात केपीसीएल ला इशारा

    चंद्रपुर:  बरांज (मो) येथील ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन होते, या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीराख्यांना मताधिक्याने निवडून दिले आहे. हि या आंदोलनाच्या यशाची सुरुवात असून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव पक्षाच्या ताकदीनिशी उभा राहील अशी ग्वाही पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. बरांज येथील नवनियुक्त सरपंच मनीषा प्रकाश ठेंगणे व उपसरपंच रमेश भंगू भुक्या यांच्या सत्कार  सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अहीर यांनी केपीसील खान कार्यस्थळी सुद्धा भेट देत सुरु कामाचे संपूर्ण अवलोकन केले. 
      प्रसंगी गावातील नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य उज्वला रणदिवे, वनिता भुक्या, प्रमिला आत्राम यांच्यासह भाजपचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे, पं. स. सभापती प्रवीण ठेंगणे, विजय वानखेडे, सुनील नामोजवार, प्रवीण सातपुते, प्रशांत डाखरे, किशोर गोवारदीपे,  अफझलभाई तसेच गावातील रमेश महाकुलकर, संजय ढाकणे, विजय रणदिवे, श्रीराम महाकुलकर, नितेश बेलेकर, मनोहर बोढाले, संजय निखाडे, लक्ष्मण भुक्या , संजय सालूरकर आदी ग्रामस्थांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

         पुढे बोलतांना अहीर यांनी सत्तेत असो वा नसो शेतकरी, नागरिकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच लढा देत राहील असा विश्वास गावकऱ्यांना दिला. केपीसीएल चा प्रकल्पाच्या पायाभरणी पासून आपण प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहे, त्यावेळेस सुद्धा सत्तेत नव्हतो आज राज्यात सत्ता नसली तरीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन केंद्र सरकारची व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद पाठीशी घेत या प्रकाळग्रस्तांना न्याय मिळवून देवू. केपीसीएल ने या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता त्वरित करावी अन्यथा महाग पडेल असा तीव्र इशारा यावेळी हंसराज अहीर यांनी दिला. 
         ग्रामस्थांनी ग्राम पंचायत निवडणुकीत आज एकमत करून योग्य उमेदवारांना विजयी  केले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्यात या नवनियुक्त सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांचा नक्कीच सक्रिय सहभाग राहील असा विश्वास यावेळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.