चंद्रपुर जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून 100 पेटी दारु जप्त। #Daru #Brahmapuri

चंद्रपुर जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून 100 पेटी दारु जप्त

उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई विशेष पथकाने छापा टाकला

चंद्रपूर ,11 मार्च : ब्रह्मपुरी नगर परिषदेचे काँग्रेसचे नगरसेवक महेश भर्रे यांच्या घरी मुंबई येथील उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकला . त्यांच्या घरून शंभर पेटी दारू जप्त करण्यात आली . ब्रह्मपुरी शहरातील पेठ वॉर्ड परिसरात असलेल्या त्यांच्या घरी बुधवारी ( ता . १० ) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली .

चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतिल काँग्रेस नगरसेवकाच्या घरातून 100 पेटी दारु जप्त करण्यात आली. नगरसेवक महेश भर्रे यांच्या घरात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. भर्रेंच्या घरातून 100 पेटी दारु जप्त झाल्याचं वृत्त पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे. महेश भर्रे हे चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नगर परिषद प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेवक आहेत. 

महेश भर्रे हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील पेठ वार्ड परिसरात राहतात. भर्रे यांच्या घरातून काल रात्री उशिरा दारुसाठा जप्त करण्यात आला. मुंबईहून चंद्रपुरात (ब्रह्मपुरी) आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने ही कारवाई केली.

काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे गेल्या अनेक महिन्यांपासून दारु तस्करीत सामील असल्याची चर्चा होती. राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचंही बोललं जात होतं. पण उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

महेश भर्रे आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु नगरसेवक भर्रे कारवाईच्या वेळी घरी उपस्थित नसल्यामुळे त्यांना सध्या अटक करण्यात आलेली नाही. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केवळ कागदावर असल्याचे बोलले जाते. मात्र, याचा नमुना आज बघायला मिळाला. 
दरम्यान, चंद्रपुरात विषारी दारु निर्मिती तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी महेश भर्रे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. ज्या कर्मचार्‍यांच्या आशीर्वादाने हा बेकायदेशीर व्यवसाय सुरु आहे, त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणीही भर्रेंनी केली होती.