चिंताजनक : महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ Corona Maharashtra

चिंताजनक : महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ 

आज राज्यात 15,817 नवीन रुग्ण

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेष म्हणजे दिवसागणिक रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. आज राज्यात 15,817 नवीन रुग्णांचे निदान झालेय. तर राज्यात आज 56 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालीय. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 22,82,191 झाली. 

राज्यात आज 11,344 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर राज्यात आजपर्यंत एकूण 21,17,744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.79% एवढे झालेय. आज राज्यात 15,817 नवीन रुग्णांचे निदान झालेय. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.31 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,73,10,586 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 22,82,191 (13.18 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,42,693 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 4,884 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 1,10,485 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.