सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण, सचिन तेंदुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली #CoronaPositive #SachinTendulkar

सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण,

सचिन तेंदुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी सचिनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. माझ्या घरातील इतर सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. मी घरातचं क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व खबरदारी मी घेत आहे, असं सचिनने म्हटलं आहे.