पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतली कोरोना लसनागरीकांनी निर्भय होऊन लस घ्यावी Hansraj Ahir Covid-19 Vaccine

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतली कोरोना लस

नागरीकांनी निर्भय होऊन लस घ्यावी

चंद्रपूर : पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 05 मार्च 2021 रोजी कोविशिल्ड कोरोना लस घेतली.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात जावून त्यांनी ही लस घेतली. यावेळी वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अत्यंत प्रभावी कार्य होत असल्याबद्दल त्यांचे व लस घेतलेल्या ज्येष्ठांचे पुष्पगुच्छ देवून अहीर यांनी स्वागत केले.
लसीकरण प्रसंगी अधिष्ठाता डाॅ. हुमने, जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. निवृत्ती राठोड उपस्थित होते. सदर लस ही कोरोनासारख्या महामारीवर प्रभावी असल्याने जेष्ठांपासुन सर्व संबंधीतांनी ही लस घेवून कोरोनाच्या संकटापासुन स्वतःला सुरक्षीत ठेवावे असे आवाहन करून या लसीबाबत निर्माण करण्यात येत असलेल्या अफवा व गैरसमजाला बळी न पडता ही लस स्वयंस्फुर्तीने घेण्यास सर्वांनी पुढे यावे असे आवाहन अहीर यांनी या लसीकरणाचे पार्श्वभूमीवर  केले.