Maharashtra Corona Update : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा उद्रेक! आज महाराष्ट्रात रिकॉर्ड ब्रेक कोरोना नविन रुगणांची नोंद #RecordBreakCorona #महाराष्ट्र

Maharashtra Corona Update : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा उद्रेक! 

 गेल्या 24 तासांत 40 हजार 414 नवे रुग्ण, 

राज्यात 108 जणांचा मृत्यू

मुंबई ,28 मार्च  : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अन्य शहरांतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नियमानुसार रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतकच नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या राज्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. 
महाराष्ट्र राज्यातील गेल्या 24 तासांतील कोरोनास्थिती जाणून घ्यायची झाल्यास कोरोनाचं विदारक चित्र आपल्यासमोर निर्माण होत आहे. कारण आज दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा कोरोनमुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 6 हजार 923 जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

पुण्यात गेल्या 24 तासांत तब्बल 4 हजार 426 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

नाशिकमध्येही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज 2 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 310 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आज 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.