महाराष्ट्रात आज आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना मृत्यू, नविन कोरोना पॉजिटिव संख्याही चिंताजनक #MaharashtraCoronaUpdateToday

 महाराष्ट्रात आज आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना मृत्यू

नविन कोरोना पॉजिटिव संख्याही चिंताजनक

महाराष्ट्रात आज तब्बल 227 जणांचा मृत्यु

आज 39544  नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई , 31 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाच्या  वाढत्या रुग्णसंख्येसोबतच आता वाढणारे मृत्यूचे  प्रमाणही चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना महामारीचा काळ सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वाधिक मृत्यूचा आकडा आज नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज तब्बल 227 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

महाराष्ट्रात राज्यात आज 39544  नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे हा ही आकडा धडकी भरवणारा आहे. 

मुंबईतही आज 5394 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 15  लोकांनी आपला कोरोनामुले जीव गमावला आहे. 

नागपूर शहरातही 2885 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 58 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

दरम्यान महाराष्ट्रातील ही वाढती रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन लागेल की काय, अशीच भीती होती. सूत्रानुसार महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन नाही, तर निर्बंध कठोर होतील. ज्यामध्ये सार्वजनिक वाहतूक तर सुरू राहील, मात्र मॉल, सिनेमागृह यांसारखी गर्दीची ठिकाणे बंद करण्यात येतील, अशी शक्यता आहे.