पंतप्रधान नरेन्द्र मोदी बांगलादेश मुक्ती आंदोलनात नक्की अटक कधी? , तुरुंगात, पोलीस स्टेशन कोणते? , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा खोचक सवाल #PMModi #JayantPatil

पंतप्रधान नरेन्द्र मोदी बांगलादेश मुक्ती आंदोलनात नक्की अटक कधी?

तुरुंगात, पोलीस स्टेशन कोणते?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा खोचक सवाल

मुंबई , 29 मार्च :  बांगलादेश मुक्ती लढ्यात आपणही तुरुंगवास भोगला होता. या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. मोदींना बांगलादेश मुक्ती आंदोलनात नक्की अटक कधी झाली? त्याची कोणत्या पोलीस ठाण्यात नोंद आहे? त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते? असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. 

जयंत पाटील यांनी ट्विट करून पंतप्रधानांना हा खोचक सवाल केला आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा. मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले?, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते? याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा चिमटा पाटील यांनी काढला आहे.
बांगलादेशाच्या दौर्‍यावर असताना बांगलादेश मुक्ती लढ्यात सहभागी झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियातून जोरदार खिल्ली उडवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनीही पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा, असा खोचक टोला लगावला आहे.