मुंबईः शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आलीय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरेंनाही कोरोनाची लागण झालीय. त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन होणार आहेत. रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरला आहे.शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढलीय.