चंद्रपुर जिल्ह्यातील 05 दिवस छोट्या व्यावसायिकांना परवानगी द्या , 'माझा व्यवसाय माझी जबाबदारी' या अटीवर नियम शिथिल करा , खासदार बाळू धानोरकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी #Chandrapur #KhasdarDhanorkar

चंद्रपुर जिल्ह्यातील 05 दिवस छोट्या व्यावसायिकांना परवानगी द्या 

 'माझा व्यवसाय माझी जबाबदारी' या अटीवर नियम शिथिल करा 

खासदार बाळू धानोरकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी 

चंद्रपूर  : चंद्रपुर जिल्ह्यात आपत्कालीन उपाययोजना साठी ३० एफ्रिल पर्यंत नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त निबंध लावण्यात आले आहे. परंतु मागील वर्षभरापासून लहान व्यापारी त्रस्त होते. दोन महिन्यापूर्वी त्यांची गाडी रुळावर आली होती. आणखी त्यांची दुकाने बंद करणे त्यांच्यावर अन्याय होणार आहे. 'माझा व्यवसाय माझी जबाबदारी'  या अटीवर सर्व नियमाचे पालन करीत त्यांची दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

     छोटे व्यावसायिक वर्ग जात कापड दुकानदार, जनरल स्टोअर्स, सलून व इतर व्यावसायिकांचे प्रतिष्ठाने सरसकट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.  हे व्यावसायिक कसे बसे कुटुंब जागवत असतात. बँकेचे हप्ते देखील भरण्यासाठी यांच्याकडे दुकान बंद असल्यामुळे पैसे नाही. मागे अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना सर्वाना अवगत आहेत. त्यामुळे यात शिथिलता आणत सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. पहिल्या कोरोना लाटेत लॉकडाऊन मध्ये लहान मोठे व्यावसायिक प्रचंड डबघाईस आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी देखील लोकडाऊन चे परिणाम गंभीर होतील याकडे लक्ष वेधले आहे. 

   त्यासोबतच रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा जाणवत असून दराबाबत व संभाव्य काळाबाजाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन छापे टाकण्याचे आदेश देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.