महाराष्ट्र राज्यात 1 मेपर्यंत कडक निर्बंध लागू; ब्रेक द चैन! काय आहेत निर्बंध?काय सुरु ,काय बंद ? Maharashtra Lockdown Break The Chain

महाराष्ट्र राज्यात 1 मेपर्यंत कडक निर्बंध लागू; 

ब्रेक द चैन! काय आहेत निर्बंध?

काय सुरु ,काय बंद ?

मुंबई, दि.१३ अप्रैल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यात 1 मे 2021 पर्यंत 144 कलम लागू करण्याची घोषणा.  संपूर्ण संचारबंदी. केवळ आवश्यक सेवा सुविधा, दुकाने सुरू

यासंदर्भातील मदत व पुनर्वसन विभागाचे ब्रेक दि चेनचे आदेश सोबत जोडले आहेत

ब्रेक द चैन! काय आहेत निर्बंध?

उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार आहे.

मंगळवेढा-पंढरपूरमध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील.

उद्या संध्याकाळपासून राज्यात 144 कलम चालू.
 
पुढचे 15 दिवस संचारबंदी.

अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे.

घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये. 

आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. 

सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.

लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील.

जनावराचे रुग्णालय सुरु राहतील.

पावसाळी पूर्व कामं सर्व सूरू राहतील.

अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहील.

हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहतील.

रस्त्यावरच्या ठेले वाल्यांनाही टेक अवेची घोषणा.

प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदुळ.

7 कोटी लोकांना देण्यात येईल एक महिना मोफत.

काही कोटी लोकांनी याचा लाभ घेतला 

रोजी रोटीचा भार नाही कर्तव्य पार पाडत आहे.

वयोवृदध, महिला, आदिवासी, निराधार लोकांना 2 महिन्यांकरता हजार रुपये 35 लाख लोकांना देत आहोत.

नोंदणीकृत बांधकाम मजूरांना आणि घरकाम करणा-या लोकांना मदत करत आहोत.

अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देत आहोत.