गडचिरोली जिल्ह्यात 13 मृत्यूसह आज 524 नवीन कोरोना बाधित तर 226 कोरोनामुक्त Gadchiroli Corona

गडचिरोली जिल्ह्यात 13 मृत्यूसह आज 524 नवीन कोरोना बाधित तर 226 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.18 अप्रैल : आज जिल्हयात 524 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 226 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 15009 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11692 वर पोहचली. तसेच सद्या 3104 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 213 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. 

आज 13 नवीन मृत्यूमध्ये
रा. नवेगाव  गडचिरेाली येथील 72 वर्षीय पुरुष, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय महिला, 
चंद्रपुर जी. ता. चिमुर येथील 58 वर्षीय पुरुष, 
रा. रामनगर गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष, 
ता. लाखांदुर जि. भंडारा येथील 58 वर्षीय पुरुष, 
ता. वडसा जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, 
रा. स्नेहानगर, गडचिरोली येथील 50 वर्षीय महिला, 
ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 69 वर्षीय पुरुष, 
ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील 62 वर्षीय पुरुष, 
ता. कोरची जि. गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुष, ता. पवनी जि. भंडारा येथील 65 वर्षीय पुरुष, 
रा. सर्वोदय वार्ड गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, 
ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 57 वर्षीय पुरुष 
यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.

 यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.90 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 20.68 टक्के तर मृत्यू दर 1.42 टक्के झाला.

          नवीन 524 बाधितांमध्ये 
गडचिरोली तालुक्यातील 169, 
अहेरी तालुक्यातील 34, 
आरमोरी 38, 
भामरागड तालुक्यातील 19, 
चामोर्शी तालुक्यातील 30, 
धानोरा तालुक्यातील 27, 
एटापल्ली तालुक्यातील 16, 
कोरची तालुक्यातील 30, 
कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 39, 
मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 14,
 सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 30 
तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 88 जणांचा समावेश आहे. 

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 226 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 114, अहेरी 11,  आरमोरी 16, भामरागड 17, चामोर्शी 15, धानोरा 5, एटापल्ली 9, मुलचेरा 3, सिरोंचा 1, कोरची 11, कुरखेडा 13, तसेच वडसा येथील 11  जणांचा समावेश आहे.