मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
(लोकतंत्र की आवाज़)
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी वाढला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाली आहे. एक मे पर्यंत असलेला लॉकडाऊन आणखी दोन आठवड्याने वाढला आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यासंदर्भात दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढला आहे. सात दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवावा, असं मत राज्यातील टास्क फोर्सने मांडलं होतं, मात्र 13 मे रोजी रमजान ईद असल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवावा असे काही मंत्र्यांचे मत होते. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला आहे.
15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला तर फायदा होऊ शकतो, असा तज्ञांनी सल्ला दिला आहे. राज्यात आता लॉकडाऊन वाढवण्याबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत.
महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होते आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं.