गडचिरोली जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना चा महा उद्रेक ,11 मृत्यूसह ,आज 434 नवीन कोरोना बाधित #GadchiroliCorona

गडचिरोली जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना चा महा उद्रेक ,

11 मृत्यूसह ,

आज 434 नवीन कोरोना बाधित 

गडचिरोली,(जिमाका)दि.16 अप्रैल : आज जिल्हयात 434 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 183 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 14019 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11249 वर पोहचली. तसेच सद्या 2585 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 185 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. 

आज 11 नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील  कुरखेडा येथील 64 वर्षीय पुरुष, 
आरमोरी ता. कारागोटा 56 वर्षीय महिला, आरमोरी येथील 67 वर्षीय पुरुष , 
आरमोरी 71 वर्षीय पुरुष , 
धानोरा 52 वर्षीय पुरुष, 
चंद्रपूर ता. चिमूर येथील 72 वर्षीय पुरुष, 
चंद्रपूर ता. ब्रम्हपूरी 50 वर्षीय पुरुष,
चंद्रपूर ता. सिदेवाही 61 वर्षीय पुरुष, 
चंद्रपूर ता. ब्रम्हपूरी 75 वर्षीय पुरुष, 
गोकूल नगर गडचिरोली 56 वर्षीय महिला, 
भंडारा ता. कुडेगांव 87 वर्षीय पुरुष, इ.चा मृत्यूमध्ये समावेश आहे.

 यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.24 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 18.44 टक्के तर मृत्यू दर 1.32 टक्के झाला.  

नवीन 434 बाधितांमध्ये 
गडचिरोली तालुक्यातील 165, 
अहेरी तालुक्यातील 68, 
आरमोरी 33, 
भामरागड तालुक्यातील 14, 
चामोर्शी तालुक्यातील 20,
 धानोरा तालुक्यातील 21, 
एटापल्ली तालुक्यातील 17, 
कोरची तालुक्यातील 12,
 कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 17, 
मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 04, 
सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 09 
तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 42 जणांचा समावेश आहे. 

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 183 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 75, अहेरी 14,  आरमोरी 14, भामरागड 11, चामोर्शी 08, धानोरा 09, एटापल्ली 07, मुलचेरा 03, सिरोंचा 05, कोरची 04, कुरखेडा 06, तसेच वडसा 27 येथील जणाचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील  बाधितामध्ये 12  जणांचा समावेश आहे.