लग्नात उपस्थित राहणा-या 25 जणांना लसीकरण अथवा आरटीपीसीआर चाचणी आवश्यक , -वधुवरांनाही समावेश #Marriage #vaccination #Rtpcrtest

लग्नात उपस्थित राहणा-या 25 जणांना लसीकरण 
अथवा आरटीपीसीआर चाचणी आवश्यक

 -वधुवरांनाही  समावेश

यवतमाळ, दि. 16 अप्रैल : ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. या सुचनेनुसार लग्न समारंभास जास्तीत जास्त 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची परवानगी संबंधित तहसिलदार यांच्याकडून प्राप्त करून घेणे आवश्यक असून लग्नात उपस्थित राहणा-या 25 व्यक्तिंना (वधु / वरासह) शासनाच्या नियमानुसार व पात्रतेनुसार लसीकरण करणे आवश्यक आहे.किंवा आरटीपीसीआर चाचणीचा मागील 48 तासातील निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक राहील.

लग्न समारंभासाठी केवळ 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असतांना मोठ्या प्रमाणात व्यक्ती उपस्थित राहतात किंवा टप्प्याटप्प्याने लग्नात उपस्थिती दर्शवितात, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत होत आहे. लग्न समारंभामुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याने लग्न समारंभाकरीता अटी घालून देण्यात येत आहे. 

लग्न समारंभास संबंधित तहसीलदारांची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. लग्न समारंभास फक्त 25 व्यक्तीच उपस्थित राहतील व टप्प्याटप्प्याने व्यक्तींना लग्न समारंभास बोलाविण्यात येवू नये. अर्जदाराने केलेल्या अर्जानुसार त्यांना 3 तासाची परवानगी देय राहील. लग्न समारंभास उपस्थित राहणाऱ्या 25 व्यक्तींनी (वधू - वरासह) शासनाचे नियमानुसार व पात्रतेनुसार लसीकरण केलेले असणे आवश्यक आहे. किंवा आरटीपीसीआर चाचणीचा मागील 48 तासातील निगेटीव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. वरील अटींचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात म्हटले आहे.