महाराष्ट्र राज्यात आज कोरोनाचा उद्रेक , 67 हजार 123 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 419 #MaharashtraCoronaUpdate

महाराष्ट्र राज्यात आज कोरोनाचा उद्रेक

 67 हजार 123 नवे रुग्ण,

 मृतांचा आकडा 419 

मुंबई ,17 अप्रैल : महाराष्ट्र राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या महाराष्ट्रात रोज 60 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहे. आजची आकडेवारी तर चिंतेत पाडणारी आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 67,123 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. हा आकडा गुरुवारच्या (15 एप्रिल) तुलणेत 5 हजार 428 रुग्णांनी जास्त आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना आलेख वर जात असून रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यात मृतांची संख्यासुद्धा रोज वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 419 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर आज दिवसभरात एकूण 56 हजार 783 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. 
ताज्या आकडेवाडीरनुसार मुंबईत मागील 24 तासांमध्ये एकूण  8834 जणांना कोरोनाचाी लागण झाली आहे. तर एका दिवसात एकूण 6117 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 4 लाख 69 हजार 961 वर पोहोतला आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 82 टक्क्यांवर पोहोचला आहे. 
सध्या मुंबईत एकूण 87 हजार 369 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण वाढीचा दर मुंबईत 44 दिवसांवर येऊन पोहोचला आहे.