चंद्रपुर शहरातील आठ प्रतिष्ठित प्रतिष्ठानांवर महानगर पालिकाची कारवाई, ३० हजार रुपयाचा दंड वसूल #CmcChandrapur

चंद्रपुर शहरातील आठ प्रतिष्ठित प्रतिष्ठानांवर महानगर पालिकाची कारवाई

३० हजार रुपयाचा दंड वसूल
 
चंद्रपूर, ता. २७ अप्रैल : महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. २७) मनपाने चंद्रपूर शहरातील झोन क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या ८ प्रतिष्ठित प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३० हजार रुपयाचा दंड वसूल केला.  
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. एकच्या सहायक आयुक्त शीतल वाकडे, क्षेत्रिय अधिकारी भाऊराव सोनटक्के, स्वच्छता निरीक्षक उदय मैलारपवार, अतिक्रमण पथक व झोनचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
आस्थापना तपासणीत हरदेव बिग बाजार (ताडोबा रोड), हरदेव प्रोव्हीजन (गजानन महाराज मंदिर रोड), अपना भंडार (सिस्टर कॉलनी), साईबाबा प्लाॅयवूड (दाताडा रोड), अमोल ट्रेडर्स (दाताडा रोड), निलेश इलेक्ट्रिकल्स (नागपूर रोड), श्री. कलर्स (नागपूर रोड), बालाजी फुड्स (वरोरा नाका चौक) हे आस्थापना सुरू असल्याचे आढळून आले. या आठ प्रतिष्ठित प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३० हजार रुपयाचा दंड वसूल केला.  यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.