महाराष्ट्रात लॉकडाऊन की कठोर निर्बंध?; आज मुख्यमंत्री रात्री जनतेशी संवाद साधणार #MaharashtraLockdown

महाराष्ट्रात लॉकडाऊन की कठोर निर्बंध?; 

आज मुख्यमंत्री रात्री जनतेशी संवाद साधणार

मुंबई: महाराष्ट्र गेल्या महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबई , पुणे,नाशिक, नागपुरसह महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.