महाराष्ट्र राज्यासाठी पुढील आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे:अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, महाराष्ट्र राज्यात मृत्यू दर वाढला #Maharashtra #महाराष्ट्रसरकार #कोविड

महाराष्ट्र राज्यासाठी पुढील आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे:अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे

महाराष्ट्र राज्यात मृत्यू दर वाढला

मुंबई,17 अप्रैल : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे निष्काळजी करू नका, असं सांगतानाच हे राजकारण करण्याचे दिवस नाहीत. महाराष्ट्र राज्यात आगामी आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, अशी चिंता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली आहे. 

राजेंद्र शिंगणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही चिंता व्यक्त केली आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरवरून राजकारण होतंय. मी यावर काही बोलणार नाही. हे राजकारण करण्याचे दिवस नाहीत, असं सांगतानाच पुढील आठ दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं शिंगणे म्हणाले.

महाराष्ट्र राज्यात काल (16 अप्रैल) 398 रुग्ण दगावले:
महाराष्ट्रात काल (16 एप्रिल) 63,729 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. राज्यात सध्या 6 लाख 38 हजार 034 सक्रिय कोरोना रुग्ण असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37 लाख 03 हजार 584 झाली आहे. राज्यात काल 398 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 1.61% इतका झालाय. कालच्या दिवसात 45 हजार 335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 30 लाख 04 हजार 391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 35 लाख 14 हजार 181 जण होम क्वारांटाईन आहेत, तर 25 हजार 168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्र राज्यात मृत्यू दर वाढला:
महाराष्ट्र राज्यात आज 398 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. तर राज्यातील मृत्यू दर 1.61% एवढा झालाय. तसेच राज्यात आज 45,335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 एवढे झालेय. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,33,08,878 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37,03,584 (15.89 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत, तर सध्या राज्यात 35,14,181 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत, तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.