विसापूर नजिकच्‍या स्‍टेडीयम मध्‍ये जम्‍बो कोविड रूग्‍णालय उभारावे – आ. सुधीर मुनगंटीवार, #VisapurStadium #CovidCentre #SudhirMungantiwar

विसापूर नजिकच्‍या स्‍टेडीयम मध्‍ये जम्‍बो कोविड रूग्‍णालय उभारावे – आ. सुधीर मुनगंटीवार

कोविड केअर सेंटरची क्षमता 130 करावी, 60 बेडेड डीसीएचसी रूग्‍णालय उभारावे

आ. मुनगंटीवार यांनी केली जागेची  पाहणी

चंद्रपुर, 26 अप्रैल: बल्‍लारपूर तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागातील तसेच बल्‍लारपूर शहरातील वाढती कोरोना रूग्‍णांची संख्‍या लक्षात घेता विसापूर नजिकच्‍या भिवकुंड येथील समाज कल्‍याण विभागाच्‍या नव्‍या इमारतीत 60 बेडेड डीसीएचसी रूग्‍णालय उभारण्‍यात यावेत. यातील 40 ऑक्‍सीजन बेड तर 20 साधे बेड असावेत, त्‍याचप्रमाणे सध्‍या सुरू असलेल्‍या 50 बेडेड कोविड केअर सेंटरची क्षमता वाढवुन 130 करण्‍यात यावे, अशा सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या. बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुलात जम्‍बो कोविड रूग्‍णालय सुरू करण्‍यात यावे, यात 70 ऑक्‍सीजन बेडस् आणि 80 साधे बेडस् असावेत असेही आ. मुनगंटीवार यांनी निर्देशीत केले.
दिनांक 26 एप्रील रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भिवकुंड परिसरात डीसीएचसी रूग्‍णालय व जम्‍बो कोविड रूग्‍णालयासाठी जागेची पाहणी केली. यावेळी बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते निलेश खरबडे, मुख्‍याधिकारी विजय सरनाईक, तहसिलदार संजय राईंचवार, तालुका आरोग्‍य अधिकारी यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
या पाहणी दौ-या दरम्‍यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कोविड केअर सेंटर हे 130 क्षमतेचे करावे अशा सुचना दिल्‍या. येथे येणा-या रूग्‍णांना उत्‍तम सुविधा उपलब्‍ध करण्‍यावर भर देतानाच भोजनाची सोय ही अत्‍युत्‍तम असावी असेही ते म्‍हणाले. बल्‍लारपूर येथे हवेतुन ऑक्‍सीजन घेणारा प्‍लॅन्‍ट उभारण्‍याबाबत आपण सार्वजनिक आरोग्‍यमंत्र्यांशी चर्चा केली असुन जिल्‍हाधिका-यांना सुध्‍दा त्‍यादृष्‍टीने अवगत केल्‍याचे त्‍यांनी सांगीतले. वाढती रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता तालुका क्रिडा संकुल बल्‍लारपूर येथे जम्‍बो कोविड रूग्‍णालय उभारण्‍याची आवश्‍यकता  त्‍यांनी प्रतीपादीत केली. या भागातील रूग्‍णांसाठी 60 बेडेड डीसीएचसी रूग्‍णालय प्रस्‍तावित असुन हे रूग्‍णालय सुध्‍दा लवकरच मंजुर होईल याद़ष्‍टीने आपण प्रयत्‍नशिल असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. डीसीएचसी रूग्‍णालय असो वा जम्‍बो कोविड रूग्‍णालय उपकरणे, यंत्रसामुग्री आदी बाबी उत्‍तम व दर्जेदार असाव्‍या याकडे विशेष लक्ष देण्‍याबाबत त्‍यांनी यावेळी सुचित केले.